‘या’ दिवशी होणार शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीवरून दोन मतप्रवाह!



मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर दोघांनी राज्यातील कारभार सुरू केला आहे. त्यांनी कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २० जुलै रोजी मुंबईत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते जोमाने कामाला लागले आहेत. याचदरम्यान, शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार हा २० जुलै रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्र्यांच्या शपथविधीवरून शिंदे सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहे. काही होणाऱ्या मंत्र्यांनी राज्यातील पूरपरीस्थितीमुळे साधेपणाने राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी करण्याची मागणी आहे. तर काही होणाऱ्या मंत्र्यांनी विधान भवनातील प्रांगणात मोठ्या दिमाखात शपथविधी करण्याची मागणी केली जात आहे.



दरम्यान,  पहिल्या टप्यात एकूण १२ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured