Type Here to Get Search Results !

किरीट सोमय्यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘माफिया’ मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल...!

 


मुंबई: भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक ट्विट केले, या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया म्हटले आहे.


 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोमय्यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, 'आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल अभिनंदन केले.'


 

दरम्यान, सोमय्यांच्या या ट्विटमुळे शिंदेगट आणि भाजप यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कारण, भाजपसोबत सत्ता स्थापन केली असली तरीही आजही सेनेचे बंडखोर आमदार आमचे नेते हे उद्धव ठाकरे असून आपण शिवसैनिक असल्याचा दावा करतात. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies