Type Here to Get Search Results !

तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच जन्मदात्या आई वडिलांसोबतच केले हे भयानक कृत्य!



कानपूर : उत्तरप्रदेशातील कानपूर शहरात मंगळवारी प्रेमविवाह करण्यास विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई वडिलांची मुलीनेच हत्या केल्याची घटना घडली आहे.  मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. 



याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,  मुन्ना लाल उत्तम (वय 61) आणि राजदेवी (वय 55) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत. या वृद्ध जोडप्याची हत्या त्यांच्याच मुलगी कोमल हिने केली. आई वडिलांची हत्या करण्यासाठी कोमल वय (31) हिने तिचा प्रियकर रोहित (वय 28) याची मदत घेतली. 



कोमल आणि रोहितचे एकमेकांवर प्रेम होते.दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या लग्नाला कोमलच्या आई-वडिलांचा विरोध होता. कोमलच्या आई वडिलांकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती सुद्धा होती. रोहित आणि कोमलला लग्न करून ती हडप करायची होती. म्हणूनच दोघांनी मिळून ही हत्या केली.


दरम्यान, आई-वडिलांची हत्या करण्यासाठी कोमलने सोमवारी रात्री दोघांनाही ज्यूसमधून नशेच्या गोळ्या दिल्या. ज्यूस पिल्यानंतर तिचे आई वडिल बेशुद्ध झाले. बेशुद्ध पडल्यावर तिने प्रियकराला बोलावले आणि नंतर आई-वडिलांचा गळा चिरून खून केला. घटनेनंतर प्रियकर निघून गेल्यावर कोमलने आरडाओरडा सुरू केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies