Type Here to Get Search Results !

रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू!



बीड : अंबाजोगाई महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोघांना चिरडले. या अपघातात उत्तर भारतीय ताहेर हुसेन आणि इस्माईल हे दोघे ट्रक चालक व क्लिनर जागीच ठार झाले


केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथील बसस्थानकावर, रात्री 8 ते 9 च्या दरम्यान राजस्थान येथील ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. ट्रक चालक व क्लिनर हे खाली उतरून ट्रकच्या टायर मधील हवा तपासून पाहत होते. या दरम्यान अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेली भरधाव कारने त्या दोघांना चिरडले. या अपघातात दोघे ट्रक चालक व क्लिनर जागीच ठार झाले.



दरम्यान, कार ट्रक चालक व क्लिनरला चिरडून नंतर रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पडली. यामध्ये कारमधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे दोघे रा. गोपाळपूर ता. धारूर हे जखमी झाले असून पुढील घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies