Type Here to Get Search Results !

यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आषाढीच्या महापुजेसाठी विठ्ठलाच्या पूजेचे निमंत्रण!



मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच,  या नवीन सरकारने विधासभेत बहुमतही सिद्ध केले.



त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाच्या पूजेचे निमंत्रण दिले. आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. 



गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी आषाढी वारी होऊ शकली नाही. त्यामुळे लाखो वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नव्हते.कोरोना संकटात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वारकऱ्यांशिवाय ही महापूजा करावी लागली होती. परंतु यावर्षी  कोरोनाचे संकट सावरल्यानंतर आषाढी वारीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. 



दरम्यान,  मंदिर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies