Type Here to Get Search Results !

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरूजी यांची चाकूने वार करत हत्या!



हुबळी: 'सरल वास्तू'च्या माध्यमातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करणारे चंद्रशेखर गुरुजी उर्फ चंद्रशेखर अंगडी यांची हुबळीच्या एका हॉटेलमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आली. आज म्हणजेच  मंगळवारी ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  उत्तर कर्नाटकातील हुबळी येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हॉटेलच्या लॉबीमध्ये ते आले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आयुक्त लभु राम, डीसीपी (कायदा आणि सुव्यवस्था) साहिल बागला, डीसीपी गोपाल तसेच इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आरोपींच्या शोधासाठी श्वानपथकही रवाना करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies