Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांच्या ईडीच्या धाडीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ईडीच्या कारवाईला घाबरुन कृपया...!



औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या राऊतांच्या मैत्री निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. सकाळपासून राऊतांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



यावेळी एकनाथ शिंदे  म्हणाले की, 'राऊतांची चौकशी सुरू आहे, त्यांना अटक होणार की नाही हे मला माहित नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, ते तर म्हणालेत ना की मी काही केलेलं नाही. कर नाही, त्याला डर कशाला. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, काय व्हायचं ते होऊद्या,' असे वक्तव्य शिंदे यांनी केले.



तसेच,  ते पुढे म्हणाले, कि 'असंही राऊतांना कुणी बोलावलंय का? मी आज जाहीरपणे सांगतो की, ईडीच्या भीतीने जर कोणी येत असाल तर कृपया आमच्याकडे येऊ नका. भाजपामध्ये नाही आणि शिवसेनेतही नाही. हे मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. अर्जुन खोतकर असो नाहीतर आणखी कोणी असो, ईडीच्या कारवाईला घाबरुन कोणीही पुण्याचे काम करू नका,' असेहि सल्ल्या स्वरूपाचे भाष्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.



दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबादमध्ये पूर्वनियोजित दौऱ्यासाठी आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies