Type Here to Get Search Results !

संपत्तीसाठी सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये!

 



दिल्ली: येथे 50 वर्षीय सख्ख्या भावाची दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्या करून मृतदेह घरात ठेवलेल्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. पोलिसांना  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक हा मृताचा सख्खा भाऊ आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  झाकीर घरात एकटाच राहत होता आणि झाकीरच्या घरात बरीच रोकड ठेवल्याची माहिती दोघांना मिळाली होती. रोकड लुटण्याच्या उद्देशाने दोघेही झाकीरच्या घरी गेले आणि जाकीरच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घरात ठेवलेली रोकड व दागिने लंपास केले. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते पळून गेले. 



दरम्यान,  22 जुलै रोजी दिल्लीतील सीलमपूर भागात घरात ठेवलेल्या फ्रीजमधून 50 वर्षीय झाकीरचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी 55 वर्षीय आबिद हुसेन आणि मृत झाकीरचा भाऊ 25 वर्षीय जाहिद यांना अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies