Type Here to Get Search Results !

डायन असल्याच्या संशयातून नातवानेच केला आजीचा खून!



झारखंड:  झारखंडच्या सरायकेला पोलीस स्टेशन हद्दीतील महादेवपूर गावात डायन असल्याच्या संशयावरून एका वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. नातवानेच 85 वर्षीय आजीवर धारदार शस्त्राने वार केले. बुद्धेश्वर कुंभकर असे आरोपीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बुद्धेश्वर कुंभकरची आई अनेकदा आजारी असायची, त्याला आईच्या दुखण्यामागे आजी इला कुंभकर यांचा हात असल्याचा संशय आला. बुधेश्वरची आई ताबूक कुंभकर या सासू इलासोबत गावात राहत होत्या. आरोपी आजारी आईला भेटायला गेला होता, त्यादरम्यान रात्री काही कारणावरून आजीसोबत वाद सुरू झाला. या वादात बुद्धेश्वरने आजीवर चाकूने हल्ला केला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.



दरम्यान,  या प्रकरणाबाबत पोलिसांनी एफआयआर नोंदवून हत्येतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies