Type Here to Get Search Results !

सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांसमोर नवीन संकट

 



बीड : बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आणखी एक नव संकट उभे ठाकले आहे. शंकी गोगलगायनंतर आता पिवळा मोझॅक या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे सोयाबीनपिकाची पाने पिवळी पडत असून वाळून चालले आहे.

बीड जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात तब्बल 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील नेकनुर शिवारात काही ठिकाणी सोयाबीनवर हा रोग दिसून आला असून सोयाबीनसह मूग, उडीद या पिकांनाही या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.

सोयाबीन पिकावर शंकी गोगलगायीच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्याची पिवळा मोझॅक या विषाणूने चिंता वाढवली आहे. या विषाणूमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies