नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा या वेटलिफ्टरने पुरुषांच्या ६७ किलो वजनाच्या गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. जेरेमीच्या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या आधीही जेरेमीने २०१८ साली युवा ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवले होते.