मुंबई: मुंबई पुणे महामार्गावर खोपोली जवळ बस उलटून झालेल्या अपघातात चालकासह सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, हे सर्वजण हैद्राबाद येथील एका आयटी कंपनीचे कर्मचारी आहेत. ते चौक जवळील इर्शाळ गड येथे फिरायला निघाले होते. खोपोली येथे शिंगरोबा मंदिरापाशी तीव्र उतार आणि अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
दरम्यान, जखमींवर खोपोली पालिका तसेच पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहेत.