Type Here to Get Search Results !

बीड: स्विफ्ट कार आणि टेम्पोचा अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू!बीड:  बीडच्या पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ स्विफ्ट कार आणि टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाले.  दरम्यान, घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांनी अपघात झालेल्या दोन्ही गाड्यातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies