Type Here to Get Search Results !

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत "यांचा" विजय

उपराष्ट्रपती जगदीश धनखड : फोटो सौजन्य, लोकसत्ता 


नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मते पडली. तसेच १५ मते अवैध ठरली. जगदीप धनखड ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.


विद्यमान उपराष्ट्रपती वैंकया नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे भारताचे १६ वे उपराष्ट्रती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. जनता दल (युनायटेड), वायएसआरसीपी, बसपा, एआयएडीएमके यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने धनखड यांचा पक्का मानला जात होता. तर अल्वा यांना आम आदमी पार्टी (आप), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसनंतरचा दुसरा सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) पाठिंबा मिळवण्यात अल्वा यांना अपयश आले होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies