Type Here to Get Search Results !

“देवेंद्र फडणवीस ठरणार राज्याचे पॉवरफुल उपमुख्यमंत्री”: जाणून घ्या कारण!



मुंबई: राज्यात घडलेल्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र,  जरी मुख्यमंत्री शिंदे असले तरी सर्व अधिकार उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत. अशी टीका विरोधक करत असतात. अशातच आज राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.मात्र, या खातेवाटपामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सगळ्यात पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार असल्याचे बोलले जात आहे. कारण राज्यातील क्रमांक एकची खाती आणि आर्थिक नाड्या फडणवीस ह्यांच्या हातात आहेत.



दरम्यान, आज झालेल्या खातेवाटपानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे फडणवीसांकडील खाती ही महत्वाची असून ते पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.



तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकड सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग मुख्यमंत्र्यांकडे असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies