Type Here to Get Search Results !

अख्ख्या कुटुंबाची केली हत्या अन स्वत:..!



मध्यप्रदेश : इंदौरमध्ये एका व्यक्तीने अख्ख्या कुटुंबाची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली. अमित यादव असे कुटुंबाची हत्या करणाऱ्या आणि त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अमितने पहिल्यांदा पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मध्य प्रदेशच्या सागर येथे राहणारा अमित यादव इंदौरमध्ये कुटुंबासह राहत होता. मंगळवारी कुटुंहबातील सदस्यांनी अमितला फोनवरून संपर्क केला होता, परंतु, अमितचा काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्या सासरच्या नातेवाईकांना याबाबत सांगितलं. त्यानंतर अमितची सासू आणि कुंटुबातील माणसं त्याच्या घरी पोहोचले. त्यानंतर कुणीही दरवाजा उघडत नव्हता. त्यानंतर या घटनेची माहिती बाणगंगा पोलिसांना देण्यात आली.पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर दरवाजा तोडला. त्यावेळी अमित यादवने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले. अमितच्या बाजूला पत्नी आणि दोन मुलांचा मृतदेह पडला होता. अमितने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली.



दरम्यान, या गंभीर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies