Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार २७ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. व्यापारात काही सुधारणा कराव्या लागतील. धडाडीवर संयम ठेवा. भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. जुनी भांडणे मिटतील.



वृषभ:

मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल. मानसिक संतुलन हरवू देऊ नका. कार्यालयीन सदस्यांशी वादाची शक्यता.  पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या. काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल. 


मिथुन:

व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल. वाहनाचे काम निघेल.मित्रांशी सुसंवाद साधता येईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल.


कर्क:

भौतिक सुखाची अनुभूति घ्याल. तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दिनक्रम व्यस्त राहील. मन विचलीत होऊ शकते. नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल.


सिंह:

गोड बोलून कामे साध्य कराल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन प्रयोगाला यश मिळेल.

कन्या:

काही खर्च अचानक उद्भवतील. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कष्टाने मान मिळवाल.


तूळ:

कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आजचा दिवस शुभ राहील. बौद्धिक गुण वापरून कामे करावीत.


वृश्चिक:

आरोग्याची काळजी घ्यावी.विचारपूर्वक सल्ला द्या. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा. ऐनवेळी येणार्याल समस्या सोडवता येतील. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात.


धनू:

मनापासून जबाबदाऱ्या पार पाडाल. धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. आध्यात्मिक कामात रुचि वाढेल.  जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. कार्य सिद्धीस साशंकता नको. 


मकर:

मानसिक आरोग्य टिकवाल. चिकाटी सोडून चालणार नाही. निर्णय क्षमतेत वाढ होईल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल.


कुंभ:

सौम्य शब्दात आपले मत मांडा.  आज प्रवास नको. व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास भक्कम करा. जोडीदाराची प्रगती सुखावणारी असेल.  


मीन:

उगाचच मन खिन्न होण्याची शक्यता.  नोकरदार वर्गाच्या समस्या दूर होतील. मुलांवरील खर्च वाढू शकतो.  भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा ठरेल. अकारण खर्चाची शक्यता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies