Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार २३ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!


मेष:

नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. कार्यालयीन वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. शांत राहून कामे करावीत. घरात बौद्धिक चर्चा होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. 



वृषभ:

कामात गतीमानता येईल. घरासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.बोलण्यातून इतरांची मने सांभाळून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. 


मिथुन:

चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल. मित्रांशी मतभेदाची शक्यता. कामे वेळेत पूर्ण होतील. उत्तम गुंतवणूक कराल.


कर्क:

नकारात्मक विचार दूर ठेवा. मानसिक संतुलन सांभाळा. मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन माहिती शोधण्यात वेळ घालवाल. अचानक धनलाभाची शक्यता. 


सिंह:

मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल. मनोबल वृद्धिंगत होईल. ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. 


कन्या:

मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा. मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल. प्रकृतीची हेळसांड करू नका.कामातून मनाजोगे समाधान मिळेल. 


तूळ:

कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. दिवस मजेत जाईल. जुगाराची हौस भागवाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. 


वृश्चिक:

हातातील कामात यश येईल. मुलांवरील खर्च वाढू शकतो. शांत राहून कामाची पावती मिळवा. घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या. 


धनू:

प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. 


मकर:

एखादे परिवर्तन चांगले असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील. 


कुंभ:

क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील. दिवस आनंदात घालवाल. जोमाने कामे करत राहाल. भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. 


मीन:

बचतीच्या योजना आमलात आणा. मन शांत ठेवून निर्णय घ्या. चटकन आपले मत मांडू नका. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. फार विचार करत बसू नका. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies