Type Here to Get Search Results !

विनायक मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!



मुंबई : राज्यात सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत आज विनायक मेटे यांची अपघाती निधनामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील अपघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला.



राज्यातील सर्व आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या बुधवारी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी आमदारांच्या वाहनचालकांना मुंबई येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे.



दरम्यान, मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies