Type Here to Get Search Results !

व्हॉट्सअॅपने आणले सुरक्षेचे ‘हे’ ३ नवे फिचर्स; जाणून घ्या अधिक माहिती...!



नवी दिल्ली: व्हॉट्सअॅपने लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी तीन नवे सुरक्षेचे फिचर्स आणण्याचे जाहीर केले आहे. यात 'ऑनलाइन असल्याचे तसेच स्टेटस पाहणाऱ्यांसाठी स्क्रीनशॉट घेता येणार नाही. यासाठी नवे सेटींग सुरू करण्यात येणार आहे.



WhatsApp या महिन्यात एक नवे फीचर आणणार आहे, यामध्ये युजर्संना कोण ऑनलाइन दिसेल हे पाहण्याचा अधिकार असेल, म्हणजेच आता यूजर्स ऑनलाइन कोण पाहू शकतील यासाठी वेगवेगळे लॉक सेट करू शकतील.



दरम्यान, व्हॉट्सअॅपने नुकतेच 'व्ह्यू वन्स मेसेज' फीचर आणले आहे, ज्याद्वारे मेसेज एकदाच वाचता येतो आणि त्यानंतर तो आपोआप गायब होतो. त्यांनी पाठवलेल्या मेसेजचे डिजिटल रेकॉर्ड ठेवू शकत नाही. पण अशा मेसेजचे स्क्रीनशॉट घेतल्याच्या काही तक्रारी आल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन फीचर आणण्याची तयारी केली आहे.


तसेच, या महिन्यात ते एक सुरक्षेचे फिचर आणत आहेत. ज्यांना एखाद्या ग्रुपमधून बाहेर पडायचे आहे, त्यांना कुणालाही न समजता बाहेर पडता येऊ शकते. म्हणजे तुम्ही ग्रुप सोडलात तर कुणालाही नोटिफिकेशन मिळणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies