Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार २ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. मानसिक क्षमता वाढीस लागेल. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल.



वृषभ:

जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा. वैचारिक गुंतागुंत टाळावी. मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या.



मिथुन:

मनातील इच्छा पूर्ण होईल. सावध पवित्रा घ्यावा. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत.



कर्क:

विनाकारण तोंडसुख नको. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. भावनिक ताण घेऊ नका. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल.



सिंह:

आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. कामे झपाट्याने पार पाडाल. हातातील संधी सोडू नका. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. खासगी समस्या सामंजस्याने सोडवाल.



कन्या:

आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. भावनाप्रधान होऊ नका.



तूळ:

कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या.



वृश्चिक:

काही निकष ठरवावे लागतील. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका.



धनू :

गरज समजून कामे हाती घ्या. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा.



मकर:

वादाचे मुद्दे समोर आणू नका. अकल्पित लाभाची शक्यता. वरिष्ठ अधिकार्‍यांची मदत मिळेल. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा.



कुंभ:

अवाजवी खर्च वाढतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील.



मीन :

मुलांना अभ्यासात मदत कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वरिष्ठांशी ताळमेळ साधावा. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies