Type Here to Get Search Results !

बस चालकाची बेल वाजवण्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या!

 


धुळे : पुण्यातील एसटी बस डेपोमधील चालकाने धुळे येथील मुख्य मध्यवर्ती बस स्थानकात बेल वाजवण्याच्या दोरीच्या सहाय्याने बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना काल शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली आहे.पुण्यातील शिवाजीनगर डेपोची ही बस असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली असून हिरामण नाथा देवरे वय ५७, राहणार पुणे असे बस चालकाचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धुळ्यातील मध्यवर्ती बस स्थानकात पुणे-धुळे बस दाखल झाली.त्यानंतर चालक देवरे यांनी कंडक्टरसोबत जेवण केले. त्यानंतर कंडक्टर बस स्थानकातील विश्रामगृहात झोपण्यासाठी गेला असता चालक देवरे यांनी पुणे- धुळे बसमध्येच बेल वाजवण्याच्या दोरीच्या साह्याने गळफास लावत आत्महत्या केली.



दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे स्थानिक अधिकारी व शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चालक देवरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies