Type Here to Get Search Results !

“काम नाही तर जेवण नाही” : सरकारी बालगृहात चिमुकल्यांना लावले 'हे' कृत्य करायला...!



बीड - जागतिक आदिवासी दिनादिवशी रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना बालहक्क कार्यकर्त्यांनी शासकीय बालगृहात दाखल केले. मात्र शासकीय बालगृहामधील कर्मचारी आणि अधिक्षक यांच्या अमानुष वागणुकीमुळे पुन्हा त्या मुलावर भीक मागायची वेळ आली. कर्मचारी आणि अधीक्षकाकडून अमानुष छळ करत मुलांना दारू पिऊन बेदम मारहाण करून उपाशी ठेवत होते.



बीड शहरातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील सहा मुलांना, बालहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय बालगृहात दाखल केले. मात्र त्या ठिकाणचे कर्मचारी, केअर टेकर,आणि अधिक्षक यांनी या मुलांना मारहाण केली. तसेच, संडास बाथरूम, घासायला, भांडी घासायला,फरशी पुसायला लावलेले काम नाही केले तर जेवण देत नव्हते, असे मुलांनी सांगितले.



दरम्यान, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies