Type Here to Get Search Results !

प्रियकराने विधवा महिलेची दगडाने ठेचून केली हत्या!



जालना :घनसावंगी तालुक्यात बोधलापुरी येथे एका महिलेचा मृतदेह आढळला. पीडित विधवा महिलेची हत्या तिच्या प्रियकारने केली असल्याची माहिती समोर आली आहे. महादेव कडुकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे., अशी माहिती समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेशी आरोपीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसबंध होते. पीडित महिलेने एक लाख रुपयांची मागणी करत पैसे देण्यासाठी प्रियकराकडे तगादा लावला होता. याचाच राग मनात ठेवून आरोपी कडुकरने महिलेचा दगडाने ठेचून खून करून तिचा मृतदेह पुलाखाली फेकला.  बोधळापुरी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.



दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आरोपी महादेव कडुकर याचा शोध घेवून त्याला अटक केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies