नवी दिल्ली: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने अल्-कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला याला एका ड्रोन हल्ल्यात ठार केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने (CIA) अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. या मोहिमेमध्ये सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये त्याचा जवाहिरीचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे.
तसेच, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये असताना त्याच्यावरती एक मिसाईल डागण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.