Type Here to Get Search Results !

“मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांची अदलाबदल करण्याची वेळ आली तर बदल करु”: ‘या’ मंत्र्याचे मोठे वक्तव्य!



मुंबई: राज्य सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यापासून शिंदे गटातील मंत्री मिळालेल्या खात्याबाबत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आज शिंदे सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या गटातील कोणीही आमदार मिळालेल्या खात्यावर नाराज नसल्याचे  सांगितले. 



देसाई म्हणाले, शिंदे गटाचे ४० आमदार आणि ११ अपक्ष आमदार आम्ही आमचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिले आहेत. आम्हाला जे खातं दिलं त्यावर आम्ही नाराज नाही, खाते मिळालेले मंत्री नाराज नाहीत, त्यामुळे अफवा उठवू नका, शिवाय खात्यांबाबत अदलाबदल करण्याची वेळ आली तर बदल करु, मात्र, कोणाचं खातं कोणाला द्यायचं असं वाटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बदल करतील असे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies