Type Here to Get Search Results !

“वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के”; सत्ताधाऱ्यांचे उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन!



मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे,. आज शिंदे गटातील आमदारांनी आज थेट उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत होते. 



दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळाले. 'वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के अशा घोषणा शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात दिल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने-सामने आल्याचे दिसले.



तसेच, मिटकरांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला. आई-बहिणींनीवरुन शिवी दिली असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. 


दरम्यान,अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात आमदार अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies