Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ‘या’ तारखेपर्यंत ईडी कोठडी!



मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत याना  ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. 



काल खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीने सलग ९ तास चौकशी केली. या चौकशीनंतर राऊत यांची रात्री १ च्या दरम्यान त्यांना अटक केली. सकाळी मेडिकल तपासणी करुन राऊत यांना कोर्टात आणले. आज कोर्टात सुनावणी झाली.



दरम्यान, ईडीने सुरुवातीला आठ दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली होती, पण कोर्टाने चौकशीसाठी आठ दिवसांची गरज नाही म्हणत तीन दिवसांची कोठडी दिली आहे. संजय राऊत हार्ट पेशंट आहेत ते तपासाला मदत करत आहेत, असा युक्तीवाद राऊत यांच्या वकीलांनी केला. ४ तारखेला पुन्हा संजय राऊत यांना ईडीच्या कोर्टासमोर उभे केले जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies