Type Here to Get Search Results !

कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू!



बीड :बीड परळी महामार्गावरील मौज गावाजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले आहेत. यातील एक जण गाडीखाली आला; तर एक जण उडून रस्त्याच्या कडेला पडल्याने दोघांचाही मृत्यू झाला.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बीड– परळी महामार्गावर माजलगावहुन बीडकडे येणारी कार आणि बीडहुन वडवणीकडे जाणारी दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात  कारचा समोरून चक्काचूर झाला. तर दुचाकी देखील दूर फेकली गेली. 


दरम्यान, कारची दुचाकीला धडक बसल्या नंतर दुचाकीवर मागे बसलेला उंच उडून दूरवर फेकला गेला. तर दुचाकी चालक हा कार खाली आला. यामुळे दोघांचा जागीच मृत्यूच झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies