Type Here to Get Search Results !

...म्हणून घुबडे स्मशानभूमीत घर करून राहतात; जाणून घ्या अधिक माहिती !



पुणे : स्मशानभूमीत गेल्यानंतर घुबड दिसले तर मृत्यू होतो किंवा अघटित घडते, असा आपल्याकडे समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही. स्मशानभूमीच्या आजूबाजूची मोठी झाडे तोडली गेली; मात्र स्मशानभूमीतील जुनी झाडे काेणी ताेडू शकले नाही. त्यामुळे जुनी झाडे टिकली आणि तिथे घुबडांनी आश्रय घेतला. त्याचा मृत्यू किंवा भुतांशी कसलाही संबंध नाही, असे घुबड सर्वेक्षणाचे प्रमुख आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.



घुबडांचा भुतांशीही संबंध जोडला जाण्याच्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी केलेल्या घुबडांच्या सर्वेक्षणातून ही बाब आढळून आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभाग, केईएम रुग्णालय आणि इला फाउंडेशन यांच्यातर्फे हे संशोधन करण्यात आले आहे.



दरम्यान,  आज आपण  आधुनिक जगात राहत असलो तरी आजही ४० टक्के लोकांमध्ये घुबडांबाबत अज्ञान आहे. ते घुबडांना भुतांशी जोडतात. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सातत्याने जनजागृती केली पाहिजे. त्यासाठीच हा संशोधन  २०१९ मध्ये सहा महिने करण्यात आले. घुबड हा इतर पक्ष्यांप्रमाणेच आहे, असेही इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies