Type Here to Get Search Results !

गाढ झोपेत असताना अंगावर फणा काढून बसला कोब्रा अन...पाहा व्हिडीओ!



कर्नाटक: सोशल मीडियावर सापाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण विचार करा जर कुणी गाढ झोपेत असेल आणि एखादा भलामोठा कोब्रा साप त्याच्या अंगावर आला तर काय होईल? असाच एक उरात धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



एका वृत्तवाहिनीनुसार, हा व्हिडिओ कर्नाटकातील आहे. इथे एक महिला एका झाडाखाली टाकलेल्या पलंगावर निवांत पडली होती. ती गाढ झोपेत असताना तिथे एक भलामोठा कोब्रा साप आला. हा कोब्रा झोपलेल्या महिलेच्या अंगावरही चढला. महिलेला आपल्या अंगावर कोब्रा चढला असल्याचे कळाले. तिने कुठलीही हालचाल न करता देवाचे नामस्मरण सुरू केलं. महिलेची कोणतीही हालचाल होत नसल्याचं पाहून साप काही मिनिटांनंतर कोणतीही इजा न करता तिथून निघून गेला. त्यानंतर या महिलेच्या जीवात जीव आला.

 



दरम्यान, अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies