Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग:तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळली; किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर?



सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत. 14 ऑगस्ट रोजी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.



विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी 14 ऑगस्टला समुद्राच्या लाटांमुळे ढासळली. ही ढासळलेली तटबंदी मच्छीमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळे तटबंदी ढासळली हे उघडकीस आले आहे. तटबंदीचा काहिसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उदभवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचे नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies