Type Here to Get Search Results !

चिंताजनक! कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर!



मुंबई : कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू बुधवारी जीममध्ये वर्कआउट करताना ट्रेडमीलवरून अचानक खाली कोसळला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तवला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे, असे सांगितले जात आहे. इमर्जन्सी मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले असून, एन्जिओग्राफीमध्ये त्याच्या हृदयात १०० टक्के ब्लॉक्स आढळून आल्याचे बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies