Type Here to Get Search Results !

डास पकडुन त्याचे पोस्टमॉर्टम केले,का?; ‘यांचा’ सरकारला खोचक प्रश्न!



मुंबई - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. 



माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास धोकादायक आहे त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का .? असे गंमतीशीर प्रश्न विधानसभेत विचारल्यावर पूर्ण विधानसभा खळखळून हसली.



दरम्यान, विधानसभेत भुजबळांनी राज्य शासनाचा निर्णय आणि त्यातील माहिती वाचून दाखवली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडुन त्याचे वर्गीकरण केले, पोस्टमॉर्टम केले, व डास घनता काढली असे उत्तर दिले होते. यावरुन छगन भुजबळांनी सरकारला सुनावले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies