दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; १९वर्षीय दोघांचा जागीच मृत्यू!औरंगाबाद : औरंगाबाद - पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ दुचाकीवरुन भरधाव वेगाने निघालेल्या दोन युवक ट्रकला पाठीमागून जोरदार धडकल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही युवक जागीच ठार झाले.. यश नयन शेंगुळे (वय वर्ष १९) आणि आदित्य रामनाथ सुव (वय वर्ष १९) अशी मृत विद्याथ्यांची नावे आहेत. हे दोघेही गंगापूर तालुक्याचे रहिवासी होते.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, यश व आदित्य हे दोघे वर्गमित्र होते. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 'नीट'च्या रिपीट बॅचमध्ये तयारीसाठी त्यांनी औरंगाबादला क्लास लावला होता. गावाकडून दुचाकीवर (एमएच २० ईएक्स ६०४८) निघाले असताना औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला (केए ५६-४१२३) पाठीमागून त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured