Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार ३० ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

पालकांचे शुभ आशीर्वाद मिळतील. घरगुती कामे मनाजोगी पार पडतील. जुनी येणी वसूल होतील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. दिवसभर प्रसन्नता राहील. 


वृषभ:

कामातून मिळणाऱ्या फळाकडे फार महत्त्व देऊ नका.आपल्या वागण्या बोलण्यात मृदुता दिसून येईल. निर्भीडपणे कार्यरत राहावे. थोडे कमी बोलण्यावर भर द्या. मनातील सर्व चिंता काढून टाकाव्यात. 



मिथुन:

नियमित व्यवहारात खंड पडू देऊ नका. मानसिक स्थैर्य बाळगा. कौटुंबिक चर्चा हिताची ठरेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. पैशांचा उपयोग गरजेसाठी करावा. 


कर्क:

भौतिक सुखावर खर्च कराल. गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर या. नात्यातील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. चूक मान्य करावी.


सिंह:

आत्मविश्वास वाढीस लागेल. बक्षि‍सास पात्र व्हाल. नवीन योजनांवर काम चालू करण्यास उत्तम दिवस. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामे समाधानकारकरित्या पार पडतील. 


कन्या:

ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभेल. घरात धार्मिक कार्यासंबंधी बोलणी कराल. दिवस बर्यािपैकी अनुकूल राहील.  डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. 


तूळ:

मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. आपलाच विचार पारखून घ्यावा. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराचा विचार जाणून घेऊन मगच प्रतिक्रिया द्या. विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यास उत्साही राहतील. 


वृश्चिक:

एखादी नवीन ओळख होईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जुनी येणी वसूल होतील. मन प्रफुल्लित व प्रसन्न राहील. 


धनू:

गुंतवणूक करताना सारासार विचार करा. मनाची चंचलता काबूत ठेवा. तुमच्या ज्ञानात भर पडेल. तुमचा सल्ला विचारात जाईल. व्यायामाची आवड निर्माण होईल. 


मकर:

उगाचच विरोध दर्शवू नका. गूढ विचारात रमून जाल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. मुलांशी मन मोकळ्या चर्चा कराल. दिवस खिलाडु वृत्तीने घालवाल. 


कुंभ:

भागीदारीत समाधानी राहाल. घरातील कामे आवडीने कराल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक गोष्टींत अधिक वेळ घालवाल. हातातील अधिकारात वाढ होईल. 


मीन:

संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहाल. बरेच दिवस वाट पाहत असलेल्या उत्तराची प्रतीक्षा संपेल. निसर्ग-सौंदर्यात रमून जाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. जबाबदारी वाढण्याची शक्यता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies