Type Here to Get Search Results !

जयंत पाटील यांना एसटी बस चालवणे पडणार महागात?



मुंबई: “विरोधी पक्षावर दबाव आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, मी एसटीचे सारथ्य केल्यामुळे चांगल्या प्रतिक्रिया आल्या त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते चिडले आहेत. आता सरकारने यावर काय कारवाई आहे ती करावी असही जयंत पाटील आज विधान भवनात वक्तव्य केले.



दरम्यान, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आले. यावेळी (NCP) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना  एसटी बस चालवणे महागात पडणार आहे. कारण एसटी बस चालवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत भाजपने  पोलिसात तक्रार दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies