Type Here to Get Search Results !

‘सामना’ वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदाची सुत्र आता “यांच्या” हाती!



मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असणाऱ्या सामना या वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदाची सुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या हाती घेतली आहेत. 


दरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केलेली अटक केली. या पार्श्वभूमिवरती आता उद्धव ठाकरें यांनीच आपल्या हातात सामनाची सुत्र घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह आला आहे. तसेच, या मुखपत्राद्वारे ते आपली भूमिका देखील मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.  त्यामुळे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अटकेनंतर ही मोठी घडामोड शिवसेनेमध्ये झाल्याचे समोर आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies