सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत शिवाजी थोरात याने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुऱ्हाडीने पाठीवर वार केला होता. आईला कुऱ्हाडीने मारुन जखमी केले म्हणून शिवाजी थोरात यांचा मुलाने झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. त्यात शिवाजी यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीला कुऱ्हाडीने मारल्याचा राग मनात धरुन शिवाजी यांचा मेव्हुणा भीमराव जाधवने ही देखील त्यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने दोन्ही हात, पाय, मांडी आणि छातीवर मारहाण केली.
दरम्यान, या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.