Type Here to Get Search Results !

“शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची...”: आदित्य ठाकरेचे मोठे वक्तव्य!



मुंबई: "मंत्रिपद मिळावे म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा दिल्या जात आहेत," अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाने केलेल्या बॅनरबाजीवर दिली. "मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले आहे," असे आदित्य ठाकरे म्हणाले.



दरम्यान, आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचे वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होतं. मात्र, मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. शिंदे गटाने आज आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला.  यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसतेय, निराशा दिसतेय. म्हणून टार्गेट केलं जातं आहे."


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies