Type Here to Get Search Results !

रक्षाबंधन निमित्त ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्याची सोन्याची राखी केली अर्पण!



पुणे: रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे.



प्राप्त माहितीनुसार, वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याची राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. ज्ञानेश्वर माऊलीविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना सोन्याची राखी अर्पण करुन रक्षाबंधन सण साजरा केला आहे. 



तसेच, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचीदेखील ज्ञानेश्वर माऊलींनी रक्षा करावी अशी प्रार्थना गाडे कुटुंबीयांनी या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies