‘या’ कारणामुळे, मुख्यमंत्र्यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम रद्द!पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी ते माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वखर्चातून बांधलेल्या नामदार एकनाथ भाई शिंदे उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार होते. मात्र, आता त्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता नसल्याने हा उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. तसेच या उद्यानाचे नाव देखील आता काढून टाकण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे केवळ नागरिकांना भेटून पाहणी करून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


शिंदेच्या उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत ते नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच, उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असही त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी या नामकरनाला प्रशासकीय मान्यता नाही, त्यामुळे आजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured