Type Here to Get Search Results !

व्हिडीओ: पोलिसांनी नागरिकाला बंद खोलीत लाथा बुक्यांनी केली मारहाण!



पुणे : पुणे पोलिसांनी दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पुराणिक हे बंद खोलीत एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत.

 


दरम्यान, पुराणिक यांच्याविरोधात यापूर्वी सुद्धा अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. तसेच, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे त्या पोहचल्या सुद्धा आहेत. मात्र, असे असून सुद्धा आयुक्त अमिताभ गुप्ता हे गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ पुराणिक हे बंद खोलीत एका नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहेत. (सौ. साम)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies