Type Here to Get Search Results !

अंडी खाल्याने तुमची किडनी होऊ शकते खराब: जाणून घ्या अधिक माहिती!



आटपाडी: मानवी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. तसेच, पिळदार शरीरयष्टी करण्यासाठी बॉडी बिल्डर्स त्यांच्या आहारात नेहमीच अंड्याचे प्रमाण अधिक ठेवतात. परंतु,अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: घरी पाळलेल्या कोंबडींची अंडी खाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते. पोल्ट्रीफार्मपेक्षा घरातील कोंबड्यांची अंडी धोकादायक असल्याचं, एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.



संशोधनानुसार, अंडी फक्त ताजे असणे हे त्याच्या शुद्धतेचे लक्षण नाही.यात आणखी एक धोका आहे. संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील २५ हजार घरांच्या बागांमधून मातीचे नमुने घेण्यात आले. यामध्ये सिडनीतील ५५घरांच्या मातीचा समावेश होता. पोल्ट्रीमध्ये वाढवलेल्या कोंबड्यांपेक्षा पाळीव कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये ४० टक्के जास्त शिसे आढळून आल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. सिडनीमध्ये दर दोनपैकी एका कोंबडीमध्ये शिसे आढळून आले.



कोंबडी आणि त्यांच्या घरांमध्ये वाढलेल्या अंड्यांमध्येही शिसे आढळून आले आहे. जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. दरम्यान, एकट्या ऑस्ट्रेलियात चार दशलक्ष लोक पोल्ट्री पाळतात आणि त्यांची अंडी मोठ्या प्रमाणावर विकली जातात. घरात वाढलेली कोंबडीची अंडीही आरोग्यासाठी चांगली नसतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.



जागतिक आरोग्य संघटनेच्या मते,शिसे अनेक प्रकारे मानवांसाठी धोकादायक आहे. यामुळे रक्तदाब वाढतो, किडनी खराब होऊ शकते,हृदयविकार होऊ शकतो आणि IQ पातळी देखील कमी होऊ शकते.याशिवाय, हे महिलांमध्ये गर्भपाताचे कारण बनू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies