Type Here to Get Search Results !

‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने केली आत्महत्या!



हैदराबाद: तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या कन्या उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केली आहे. हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरातील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.



प्राप्त माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या कन्या उमा माहेश्वरी या आपल्याच घरात मृतावस्थेत पंख्याला लटकलेल्या स्थितीत कुटुंबीयांना आढळून आल्या आहेत. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही वर्षांपासून त्या नैराश्य आणि आरोग्यासंबंधी समस्यांशी सामना करत असल्याची माहिती समोर येत आहे.



दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies