Type Here to Get Search Results !

मुंबई विमानतळावरुन 5.38 कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त!



मुंबई : मुंबई कस्टम विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन  तब्बल 12 किलो सोनं जप्त केलाआहे. या सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. एकूण सहा जणांना विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. छुप्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत परदेशी नागरिकावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 



माहितीनुसार, परदेशी नागरिकांनी एक विशिष्ट प्रकाराचा तयार केलेला बेल्ट परिधान केला होता. या बेल्टबाबत शंका आली म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं आढळलं. या सोन्याचं वजन केलं असता, तब्बल 12 किलो सोनं असल्याचं तपासाअंती  उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या 12 किलो सोन्याची किंमत तब्बल 5 कोटी 38 लाख रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



दरम्यान, एकूण सहा जणांना कस्टम विभागाने अटक केलीय. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही सुडानी नागरीक असल्याचीही माहिती समोर आली आहे. सुडानी नागरिकासह अटक करण्यात आलेल्या सर्वांची आता कसून चौकशी केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies