Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार १ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

कार्यक्षेत्रात नवीन अधिकार मिळतील. जवळचा प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. आपल्या तत्वाला थोडी मुरड घालावी लागेल. आततायीपणा करून चालणार नाही.  अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. 


वृषभ:

बोलण्यात खंबीरपणा ठेवावा. मित्रांची संगत तपासून पहा. तुमच्याबाबत इतरांचा गैरसमज होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. 


मिथुन:

काही निर्णयासाठी थांबावे लागेल.  वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.  जोडीदाराचे सक्रिय सहकार्य मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल. 


कर्क:

नवीन ओळखीचा लाभ होईल.  जोडीदाराच्या मताचा विचार करा. भावनिक विचार करू नका. आळसात दिवस ढकलू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा.


सिंह:

माणसे ओळखायला शिकावे. नेटाने व्यायाम करावा. मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. डोके शांत ठेवून काम करावे.


कन्या:

अन्यथा पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.  मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. 


तूळ:

सर्व गोष्टींची खातरजमा करावी. आपला दिवस आनंदात जाईल. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. लहान प्रवासाची शक्यता. मार्गदर्शक व्यक्तींच्या भेटीचा योग. 


वृश्चिक:

नवीन गोष्टी जाणून घेता येतील. महिला सहकार्यां ची उत्तम साथ मिळेल. कुटुंबात अधिकार प्राप्त होईल. चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल. व्यवसाय वाढीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 


धनू:

आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या सद्गुणांनी आनंद मिळेल. तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. कर्ज फेडीचे एक पाऊल पुढे टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. 


मकर:

आजचा दिवस चांगला जाईल. आपल्या माणुसकीची इतरांना कल्पना येईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. धडपडया वृत्तीवर संयम ठेवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. 


कुंभ:

आर्थिक लाभाचे योग. मानसिक प्रसन्नता लाभेल. पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. जुन्या मित्रमंडळींशी संवाद होईल. आपल्या वागणुकीने वाहवा मिळवाल. 


मीन:

तुमच्या बोलण्याचा घरातील लोकांवर प्रभाव पडेल. घेतलेला निर्णय योग्य ठरेल. धार्मिक आवड वाढीस लागेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies