Type Here to Get Search Results !

“...त्यामुळे आम्हाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी आमचे जुनेच दिवस परत द्यावे”: ‘यांचा’ भाजपवर हल्लाबोल!नवी दिल्ली: दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, देशात सध्या भितीचे वातावरण आहे आणि या देशातील भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी लोक तयार आहेत आणि ते सर्वजण पवार साहेबांकडे आशेने पाहत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात, असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले, “अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्यावेत. अच्छे दिन चे स्वप्न दाखवताना जे सर्वसामान्यांच्या हातात होते ते देखील लुटून हे सरकारी घेऊन गेले आहे त्यामुळे आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्या, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies