Type Here to Get Search Results !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन!



मुंबई : रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ वर्षी निधन झाले आहे. द्वारका आणि शारदा पिठाचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू म्हणून मानले जातात.



स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज हे कोटी हिंदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ आहेत. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराजांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील जबरपूरजवळील दिघोरी गावातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे होते. परंतु, त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले तर १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. १९८२ मध्ये ते गुजरातच्या द्वारकाशारदा पीठ आणि बद्रिनाथच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य बनले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies