Type Here to Get Search Results !

सप्टेंबर महिना ‘या’ राशींना ठरणार खूपच खास; मोठा आर्थिक लाभ होणार!आटपाडी: सप्टेंबर महिन्यात सर्वच राशींच्या लोकांवर बाप्पाचा आशीर्वाद राहील. मात्र, काही राशींच्या लोकांसाठी येणारा महिना खूपच खास ठरणार आहे. जाणून घ्या सप्टेंबर महिन्याचे राशीभविष्य.

मेष:

खाजगी नोकरी करणाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे आणि रागावर नियंत्रण ठेवावे. व्यवसायाच्या विस्तारामुळे तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर्सही मिळू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता येईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने राहा आणि वाद घालू नका. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. दुखापत होण्याची शक्यता आहे, बदलत्या हवामानाने तब्येत बिघडू शकते, त्यामुळे आहाराची काळजी घ्या. अचानक मिळालेले पैसे खर्च करण्याऐवजी भविष्यासाठी राखून ठेवा.


वृषभ:

या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात नशीब साथ देईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून बढती आणि सहकार्य मिळेल. सगळीकडे स्तुती होईल पण गर्विष्ठ होऊ नका. सौंदर्य प्रसाधने, कला आणि तयार कपड्यांचे व्यापारी चांगले नफा कमावू शकतात. परदेशी कंपन्यांसाठी काम करणाऱ्यांनाही यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होतील. प्रेमसंबंधांमध्ये तृतीय व्यक्ती गैरसमज निर्माण करू शकते, त्यामुळे सावध राहा. कुटुंबात सुरुवातीला तणाव राहील पण नंतर सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, संसर्ग होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या.

मिथुन:

या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळतील आणि नोकरीत बढती मिळू शकते. मानसिक ताण घेऊ नका. निर्यात-आयात व्यापार्यां ना चांगला नफा मिळेल. व्यवसाय विस्तारासाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा, तरूण मेहनत करून आपले ध्येय साध्य करू शकतील. भावंडांसह कुटुंबात शांती आणि समृद्धी राहील. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेत राहा आणि जीवनसाथीशी प्रेमाने बोला. आरोग्य चांगले राहील, गंभीर आजाराने त्रस्त असलेल्यांनाही आराम मिळेल. तुमची आर्थिक संकटातून सुटका होईल, पण भविष्यासाठी बचत करत राहा.

कर्क:

या राशीच्या नोकरदारांना सप्टेंबरच्या सुरुवातीला उत्तम संधी मिळतील. व्यवसाय चांगला चालेल आणि विस्तार करण्यास सक्षम असेल परंतु अहंकार जोपासू नका, अन्यथा तुम्ही याचा फायदा घेऊ शकणार नाही. विद्यार्थी भावंडांच्या मदतीने चांगली कामगिरी करू शकतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि भावंडांसोबत धार्मिक सहलीचे नियोजन करू शकाल. जोडीदाराशी वाद घालू नका. तब्येत कमी-अधिक प्रमाणात ठीक राहील, पोटाचे विकार होऊ शकतात, त्यामुळे आहाराची काळजी घ्या. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.

सिंह:

या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात चांगली कमाई करता येईल. नोकरी शोधणार्यां ची त्यांच्या चांगल्या कामासाठी प्रशंसा होईल. पगारातही वाढ होऊ शकते. व्यापारी ग्राहकांना आकर्षित करू शकतील परंतु त्यांनी शत्रूंपासून सावध असले पाहिजे. आपल्या वडीलधाऱ्यांची आणि शिक्षकांची मदत घेऊन विद्यार्थ्यांनी धैर्याने व आत्मविश्वासाने परीक्षेला बसावे. सरकारी नोकरीची तयारी करणारे यशस्वी होऊ शकतात. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, बाहेरच्या जेवणापासून दूर राहा. तब्येत बिघडू शकते. पैसे उधार देणे टाळा आणि कुठेही गुंतवणूक करू नका.

कन्या:

नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे अनुकूल फळ मिळेल. नोकरीत बदलाची संधी मिळेल. इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते, परंतु बॉसशी चांगले संबंध ठेवा. व्यवसायात बदल करण्यासाठी योग्य वेळ आहे, परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आणि बेकायदेशीर कामे करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि गोंधळात पडू नये अन्यथा त्याचा परिणाम परीक्षेत दिसून येईल. एखाद्या वाईट सवयीमुळे जीवनसाथी नाराज होऊ शकतात. घरातील वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करा अन्यथा अशांती तुम्हाला त्रास देईल. जोडीदारासोबत वेळ घालवा. सांधेदुखी आणि हाडांची समस्या असू शकते.

तूळ:

करिअरच्या बाबतीत, प्राधान्यक्रमांकडे लक्ष द्या आणि व्यावहारिक व्हा, अन्यथा कामगिरीवर परिणाम झाल्यामुळे वेगाला ब्रेक लागू शकतो. चांगल्या नोकरीच्या परिणामांसाठी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने काम करा. व्यापार्यांगनी संयमाने व्यवसाय करावा आणि प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य राखावे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना संधी मिळेल, स्पर्धा परीक्षेची तयारी होईल, यश मिळेल. प्रेमीयुगुलांचे नाते आता लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील पण रागावर नियंत्रण ठेवा. अपचन आणि गॅसची समस्या असू शकते. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक:

नोकरी शोधणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यालयीन बैठकीमध्ये तुम्ही दिलेल्या सल्ल्यांवरून वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील. व्यापार्यां्ची आर्थिक स्थिती चांगली राहील. ई-कॉमर्स, ई-मार्केटिंग, फॅशन, कपडे आणि फुटवेअरमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होईल. परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करून तरुण शिक्षक आणि पालकांची मने जिंकू शकतील. प्रेमीयुगुलांच्या नात्याची चर्चा लग्नासाठी पुढे जाईल. रागावर नियंत्रण ठेवा आणि जोडीदारावर ताण देऊ नका. फालतू खर्च होऊ देऊ नका आणि जे जास्त आवश्यक आहे तेच खरेदी करा. कोणताही आजार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जास्त थंड, गरम आणि शिळे अन्न खाऊ नका. सामाजिक जीवनात सक्रियता वाढेल आणि तुमच्या चांगल्या सहभागामुळे लोक आनंदी होतील.

मकर:

या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि पदासोबत उत्पन्नातही वाढ होईल. काही ग्रह अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ देऊ नका. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना बक्षिसे मिळू शकतात. व्यापार्यांेनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना चांगला फायदा होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. घरातील वातावरण शांत राहील आणि कोणतेही शुभ व मंगल कार्य करता येईल. तुमच्या जोडीदाराशी संभाषण करताना अनावश्यक आणि टोकदार बोलू नका. आजारी व्यक्तींनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. उत्पन्न वाढल्याने तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल.

कुंभ:

कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरला या महिन्यात वेग येईल आणि चांगले परिणाम मिळतील. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. ज्यांना सरकारी नोकरी आहे त्यांना नशिबाची साथ मिळाल्याने फायदा होईल. जमीन, मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वैद्यकीय आणि संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांनाही यश मिळेल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये तुम्हाला व्यस्त राहावे लागेल. स्वत:ला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराशी जोडून ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. जुने आजार त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन:

या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल, पदोन्नतीची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळेल. कमी मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. अभ्यास करताना मन शांत ठेवा आणि नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. घरातील कोणत्याही विषयावर सदस्यांमध्ये मतभेद असू शकतात. वाद न केलेलाच बरा. जीवनसाथीबरोबरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. तब्येत सुधारेल, हंगामी आजारांपासून सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा.(सौ.लोकसत्ता)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies